Nitin Gadkari अफजल खानाच्या कबरीवरून नितीन गडकरींचं मोठं वक्तव्य, म्हणाले महाराज 100 टक्के सेक्युलर…

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते प्रसिद्ध लेखक विश्वास पाटील यांनी लिहलेल्या The Wild Warfront या पुस्तकाचे प्रकाश करण्यात आले. यावेळी नितीन गडकरी यांनी केलेल्या भाषणात त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज हे 100 टक्के सेक्युलर होते असे वक्तव्य केले आहे.

लहानपणापासून आईवडिलांपेक्षा आमच्या हृदयातील जास्त स्थान हे छत्रपती शिवाजी महाराज यांना होतं. छत्रपती शिवाजी महाराज आदर्श शासक होते, न्यायप्रिय होते, कल्याणकारी राजे होते, आदर्श पिताही होते. रामदास स्वामींनी त्यांचं यथार्थ वर्णन केलं आहे, यशवंत, किर्तीवंत, वरदवंत, सामर्थ्यवंत जाणता राजा, निश्चयाचा महामेरु, बहुत जनांसी आधारु, अखंड स्थितीचा निर्धारु श्रीमंत योगी. प्रत्येक गोष्टीत आदर्श कुणी असेल तर ते शिवाजी महाराज. एक राजा म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी जे कार्य केलं ते उत्तमच होतं. अफझल खान आणि छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतापगडावर जेव्हा भेट झाली. अफझल खानाने छत्रपती शिवरायांवर वार केला ज्यानंतर महाराजांनी खानावर वार केले. यामध्ये अफझल खानाचा मृत्यू झाला, त्यानंतर शिवाजी महाराजांनी अफझल खानाची कबर प्रतापगडाच्या पायथ्याशी बांधा असे आदेश त्यांनी दिले. आजकाल सेक्युलर हा शब्द खूप प्रचलित आहे. या शब्दाचा इंग्रजी डिक्शनरीत दिलेला अर्थ धर्मनिरपेक्षता नाही. सेक्युलर शब्दाचा अर्थ आहे सर्वधर्मसमभाव. सगळ्या धर्मांशी न्यायाने वागणं हा सेक्युलर शब्दाचा अर्थ आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे असे राजे होते जे 100 टक्के सेक्युलर होते, असे नितीन गडकरी म्हणाले.