देशाला तब्बल 22 लाख ड्रायव्हर्स हवेत

देशात तब्बल 22 लाख वाहनचालकांची कमतरता असल्याची माहिती केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी गुरुवारी दिली. देशभरात योग्य प्रशिक्षण सुविधांच्या अभावामुळे अनेक अपघात होत आहेत. केंद्र सरकारने चालकांसाठी प्रशिक्षण संस्था स्थापन करण्यासाठी 4,500 कोटी रुपयांची योजना सुरू केली असून यामुळे तब्बल 60 लाख लोकांना रोजगार मिळेल, असा विश्वास गडकरी यांनी व्यक्त केला. रस्ते वाहतूक मंत्रालयाने देशभरात चालक प्रशिक्षण संस्था स्थापन करण्यासाठी 4,500 कोटी रुपयांची योजना सुरू केली. याअंतर्गत सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये टप्प्याटप्प्याने अशा 1,600 संस्था स्थापन केल्या जातील. दरवर्षी सुमारे 1.8 लाख लोक रस्ते अपघातात मृत्युमुखी पडतात. त्यापैकी बरेच जण प्रशिक्षण नसल्यामुळे दगावतात.