
मी गोमूत्र फार पितो, असे भाजपचे मंत्री नितेश राणे यांनी जाहीरपणे सांगितले. सध्या उन्हाळा आलाय. तुम्ही रुह अफजा पिता की गुलाब शरबत? असा प्रश्न नितेश राणे यांना विचारला असता, ‘गुलाब आणि रुह अफजा देणारा माणूस कोण त्यावर ते अवलंबून आहे. मी रुह अफजा वगैरे पीत नाही. रुह अफजा मला कोणीही चांगल्या भावनेने पाजणार नाही. तो फार गोड असतो आणि मला आवडतही नाही. मी गोमूत्र पितो. ते आरोग्यासाठी फार चांगले असते.’