राज्यभरात विधानसभा निवडणुकीसाठी मतदान सुरू आहे. यातच अनेक जिल्ह्यातून मतदानादरम्यान हिंसक घटना घडल्याच्या बातम्या समोर येत आहेत. अशीच एक घटना वर्धा जिल्ह्यातूनही समोर आली आहे. येथे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी नितेश कराळे यांना मारहाण झाल्याची घटना घडली आहे. या घटनेचा व्हिडिओही समोर आला आहे. जो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, वर्ध्याच्या उमरी मेघे गवत त्यांना मारहाण झाल्याची माहिती समोर आली आहे. मारहाणीनंतर त्यांनी सावंगी पोलीस ठाण्यात धाव घेतली आहे. भाजप कार्यकर्त्यांनी आपल्याला मारहाण केली, असा आरोप त्यांनी केला आहे.
या घटनेबद्दल बोलताना नितेश कराळे म्हणाले की, ”मी एकही शब्द बोललो नाही. मुख्य रस्त्यावर समोरासमोर दोन्ही पक्षाचे बुथ लागले होते. त्यानंतर गुंड प्रवृत्तीच्या पंकज भोयर यांचा समर्थक असलेल्या सचिन खोसे यांनी मला मारहाण केली.” ते म्हणाले की, ”खोसेंवर अनेक गुन्हे दाखल आहेत. त्यांनी सरळ मला मारहाण करण्यास सुरुवात केली. मी रस्त्याने जात असतानाच त्यांनी मला मारहाण केली. भाजपचे लोक अशी अरेरावी करत आहेत.”
View this post on Instagram