आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने पुन्हा एकदा नीता अंबानींवर विश्वास ठेवताना आयओसीच्या सदस्यपदी त्यांची एकमताने फेरनिवड केली आहे. यामध्ये एकूण 93 मतदारांनी मतदान केले. यातील सर्वच्या सर्व 93 मते नीता अंबानी यांच्या बाजूने पडली. रिलायन्स फाऊंडेशनच्या संस्थापक आणि अध्यक्षा असलेल्या नीता अंबानी 2016 मध्ये रिओ दि जानेरो ऑलिम्पिक गेम्समध्ये प्रथमच आयओसी सदस्य म्हणून निवडून आल्या होत्या.
आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीची सदस्य म्हणून पुन्हा निवड झाल्याबद्दल मला खूप अभिमान वाटत असल्याचे नीता अंबानी यावेळी म्हणल्या. मी अध्यक्ष बाख आणि आयओसीमधील माझ्या सर्व सहकाऱयांचे माझ्यावरील विश्वासाबद्दल आभार मानू इच्छिते, असे त्या म्हणाल्या. ही पुनर्नियुक्ती जागतिक क्रीडा क्षेत्रात हिंदुस्थानचा वाढता प्रभाव दर्शवते, असेही त्या म्हणाल्या. दरम्यान, नीता अंबानी यांच्या नेतृत्वाखाली हिंदुस्थानला 40 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर आयओसीच्या वार्षिक बैठकीचे यजमानपद मिळाले आहे.