मॅसेच्युसेट्सच्या राज्यपालांकडून नीता अंबानी यांचा सन्मान

अमेरिकेच्या मॅसेच्युसेट्स राज्याच्या गव्हर्नर मौरा हिली यांनी रिलायन्स फाउंडेशनच्या संस्थापक अध्यक्षा नीता अंबानी यांचा  प्रशस्तिपत्राने सन्मान केला आहे. त्यांना देण्यात आलेल्या प्रशस्तिपत्रात त्यांचा एक दूरदर्शी आणि परोपकारी व्यक्तिमत्व म्हणून उल्लेख केला आहे.यासाठी बोस्टन येथे विशेष सोहळ्याचे आयोजन केले होत

शिक्षण, आरोग्यसेवा, क्रीडा, कला, संस्कृती आणि महिला सक्षमीकरण या क्षेत्रातील नीता अंबानी यांच्या उल्लेखनीय कामाची दखल घेऊन हा पुरस्कार देण्यात येत असल्याचे राज्यपाल कार्यालयाने म्हटले आहे. या पुरस्काराने हिंदुस्थानातील आणि जगभरातील लाखो लोकांच्या जीवनावर परिणाम झाला आहे. बोस्टनमधील या खास प्रसंगी नीता अंबानीं यांनी हिंदुस्थानच्या समृद्ध कलात्मक वारशाचे प्रतीक असलेली हाताने विणलेली शिकारगाह बनारसी साडी परिधान केली होती.