![neeta ambani](https://www.saamana.com/wp-content/uploads/2025/02/neeta-ambani-696x447.jpg)
रिलायन्स फाऊंडेशनच्या अध्यक्षा नीता अंबानी हावर्ड विद्यापीठातील वार्षिक संमेलनात भारतीय व्यापार, नीती आणि संस्कृतीवर व्याख्यान देणार आहेत. यावेळी त्या हावर्ड बिझनेस स्कूलचे माजी डीन आणि शिक्षणतज्ञ नितीन नोहरिया यांच्याशी विविध मुद्दय़ांवर चर्चाही करणार आहेत. 16 आणि 17 फेब्रुवारीला हावर्ड विद्यापीठात आयोजित संमेलनात एक हजाराहून अधिक प्रसिद्ध व्यक्ती तसेच प्रतिनिधी सहभाग घेणार आहेत.