निशिता राठोडचा ‘एनएस डान्स अकॅडमी वॉव्स वुईथ स्पेक्टॅक्युलर 2024 डान्स शो’ उत्साहात संपन्न

 

नृत्य प्रशिक्षण संस्था एनएस डान्स अकॅडमीचा ‘वॉव्स वुईथ स्पेक्टॅक्युलर 2024 डान्स शो’ हा वार्षिक नृत्योत्सव नुकताच मुक्ती सांस्कृतिक केंद्राच्या सभागृहात पार पडला. हा कार्यक्रम एनएस डान्स अकॅडमीच्या विद्यार्थ्यांची अविश्वसनीय प्रतिभा, सर्जनशीलता आणि नृत्याप्रतीचे समर्पण दर्शविणारा नृत्याचा एक भव्य उत्सवच होता.

कलात्मक उत्कृष्टता आणि नृत्याची आवड जोपासण्यासाठी एनएस डान्स अकॅडमीची स्थापना प्रसिद्ध नृत्यांगना तथा नृत्यदिग्दर्शक निशिता राठोड आणि अविनाश गौडा यांनी केली. इथे विद्यार्थी नृत्य सादर करतात, पण त्याच बरोबरीने जिम्नॅस्टिक आणि हुला हूप या शैलीच्या नृत्याचे वैयक्तिक तसेच सांघिक पातळीवर दर्जेदार प्रदर्शन करतात. निशिताला सृष्टी, रिया, काजोल आणि दीपा या प्रशिक्षक म्हणून लाभल्या आहेत. या साऱ्या टीमने अकॅडमीतील विद्यार्थ्यांवर आतापर्यंतचा सर्वोत्कृष्ट कार्यक्रम सादर करण्यासाठी अथक परिश्रम घेतले.

दर्जेदार गुणवत्तेचे नृत्य प्रशिक्षण देणे, नाविन्यपूर्ण नृत्यदिग्दर्शन करणे आणि नृत्यासाठी पोषक वातावरण निर्मिती तयार करणे या तीन प्रमुख तत्त्वांमुळे एनएस डान्स अकॅडमीचा विकास झाला. आजच्या घडीला अकॅडमीमध्ये दोनशेहून अधिक विद्यार्थी नृत्याचे प्रशिक्षण घेत आहेत, जे नृत्यकला शिकत असताना स्वत:चा विकास, जडणघण करीत स्वतःला व्यक्त करण्यासाठी येत आहेत. नृत्य प्रशिक्षणासाठी एनएस डान्स अकॅडमीला गुगल रेटिंगचे 5 स्टार मिळाले आहेत.