जम्मू कश्मीरमध्ये आणखी तीन दहशतवाद्यांची घरं जमीनदोस्त, सरकार अ‍ॅक्शन मोडमध्ये

जम्मू कश्मीर आणखी तीन दहशतवाद्यांचे घर जमीनदोस्त करण्यात आले आहे. त्यामुळे आतापर्यंत 9 दहशतवाद्यांची घरं उद्ध्वस्त करण्यात आली आहेत. 22 एप्रिलला पहलगाममध्ये पर्यटकांवर दहशतवादी हल्ला झाला होता. त्यात 28 जणांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर सरकराने दहशतवाद्यांवर कारवाई सुरू केली आहे.

सैन्यअधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार रविवारी बांदिपुरा, पुलावामा आणि शोपियन जिल्ह्यात ही कारवाई करण्यात आली आहे. शोपियन जिल्ह्यात राहणारा अदनान शफी याने गेल्या वर्षी दहशतवादी संघटनेत प्रवेश घेतला होता. त्याचे घर या कारवाईत तोडण्यात आले आहे. तसेच पुलवामात अमीन नाझीरचे घर तोडण्यात आले आहे. बांदीपोरामध्ये जमील अहमद शेरगोजरी हा लश्कर-ए-तोयबासाठी काम करत होता, त्याचेही घर जमीनदोस्त करण्यात आले आहे.