बिग बॉस मराठीच्या घरातील निक्की तांबोळी आणि अरबाज पटेल यांच्या डेटिंगसंबंधीची चर्चा सुरू असताना निक्की तांबोळी हिनं समोर येऊन याबद्दल स्पष्टीकरण दिलं आहे. मी आणि अरबाज आम्ही दोघे डेटिंग करत नाही. उलट आमचं नातं हे मैत्रीपलीकडचं आहे, असे निक्कीनं म्हटलंय. बिग बॉसच्या घराबाहेर पडल्यानंतर निक्की आणि अरबाज एकत्र दिसले होते. त्यामुळे हे दोघे डेटिंग करत असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. परंतु आता या चर्चांना पूर्णविराम देण्यासाठी निक्की पुढे आली आहे. आमच्या नात्याबद्दल कोण काय बोलतं हे महत्त्वाचं नाही. परंतु आम्ही सध्या एकमेकांना समजून घेण्याचा प्रयत्न करत आहोत. बाहेर आल्यानंतर एकमेकांचं आयुष्य कसं आहे, लाइफस्टाईल कसं आहे, हे समजून घेत आहोत, असं निक्की म्हणाली. आम्ही सध्या तरी डेटिंग करत नाहीये. यातही मी काही गोष्टी नाकारू शकत नाही. अरबाज मला आवडतो, हे सर्वांना माहिती आहे. त्याच्यावर माझं प्रेम आहे. परंतु ते प्रेम निव्वळ मैत्रीचं आहे की आणखी वेगळं, हे मला माहिती नाही. पण अरबाज एक चांगला मुलगा आहे, असे निक्की म्हणाली.