मध्य रेल्वेवर 26 ते 28 नोव्हेंबरदरम्यान ‘नाईट ट्राफिक ब्लॉक’

मध्य रेल्वे मार्गावर 26 ते 28 नोव्हेंबरदरम्यान मध्यरात्री विशेष नाईट ट्राफिक ब्लॉकघेण्यात येणार आहे. लोकमान्य टिळक टर्मिनस यार्डमध्ये सीझर क्रॉसिंग आणि डबल डायमंड स्विचच्या नूतनीकरणाचे काम केले जाणार आहे. त्यासाठी हा तीन दिवसांचा विशेष ब्लॉक घेतला असून डझनभरहून अधिक लांब पल्ल्याच्या गाडय़ांच्या वेळापत्रकात बदल केला आहे. मध्यरात्री 12.50 वाजल्यापासून सकाळी 5.50 वाजेपर्यंत दुरुस्तीकामे केली जाणार आहेत. या कालावधीत लोकमान्य टिळक टर्मिनसवर येणाऱया एक्स्प्रेसची सेवा ठाणे रेल्वे स्थानकात समाप्त करण्यात येणार आहे. तसेच सकाळी धावणाऱया एक्स्प्रेसच्या निर्धारित वेळेत बदल केला जाणार आहे.