तहव्वूर राणाला पतियाळा कोर्टात हजर करणार, NIA ने शेअर केला पहिला फोटो

26/11 च्या मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याचा मुख्य सूत्रधार तहव्वूर राणाला घेऊन अमेरिकेतून विशेष विमानाने नवी दिल्ली येथे आणण्यात आले आहे. दिल्लीत आल्यानंतर त्याचा पहिला फोटो राष्ट्रीय तपास संस्था (NIA) ने शेअर केला आहे. या फोटोत तहव्वूर राणा पाठमोरा उभा दिसतोय, एनएयआयएचे पथक त्याला घेऊन दिल्ली विमानतळावर उभे असल्याचे दिसत आहे.