
कुटुंबियांशी बोलण्याची परवानगी मागणारी याचिका मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाइंड तहव्वूर राणा याने केली आहे. मात्र त्याला अशी परवानगी दिली तर तो काही महत्त्वाची माहिती नातेवाईकांना देऊ शकतो, असा युक्तिवाद करत एनआयएच्या वकिलांनी तहव्वूर राणाच्या याचिकेला विरोध केला आहे. दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकल्यानंतर एनआयए कोर्टाने निर्णय राखून ठेवला. आपल्या कुटुंबियांशी, नातेवाईकांशी बोलण्याचा आपला मूलभूत अधिकार आहे, असा दावा करत राणाच्या वतीने वकिलांनी याचिका दाखल केली आहे.