न्हावरेजवळ अपघात एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू

न्हावरे-शिक्रापूर राष्ट्रीय महामार्गावर सरके-साठेवस्तीजवळ रविवारी रात्री साडेसातच्या सुमारास कंटनेर आणि स्वीफ्ट मोटारीची धडक झाली. या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील तिघेजण जागीच ठार झाले. कैलास उर्फ दादा कृष्णाजी गायकवाड (50), गौरी कैलास गायकवाड (18), गणेश महादेव निर्लेकर (25) अशी अपघातात मरण पावलेल्यांची नावे आहेत. दुर्गा कैलास गायकवाड (45) ही महिला गंभीर जखमी असून, त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. कैलास गायकवाड हे मोटारीतून तळेगावहून न्हावऱयाकडे येत असताना, त्यांच्या गाडीला कंटनेरने जोरदार धडक दिली. या अपघातात कैलास गायकवाड आणि त्यांची मुलगी गौरी गायकवाड तसेच नातलग गणेश निर्लेकर जागीच ठार झाले, तर पैलास गायकवाड यांच्या पत्नी दुर्गा गायकवाड गंभीर जखमी झाल्या. न्हावरे पोलीस अधिक तपास करीत आहेत.