भाजपच्या माजी पदाधिकाऱ्याचा भाऊ जावेद आझमला अटक, अपहारातील 18 कोटी स्वीकारले

न्यू इंडिया सहकारी बँकेतील 122 कोटी रुपयांच्या अपहारप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने जावेद आझम (48) याला अटक केली. या प्रकरणात जावेदचे नाव आधीच समोर आले होते, परंतु तो पसार झाला होता. अखेर त्यांच्या हातात बेड्या पडल्या. भाजपचा माजी प्रदेश सचिव हैदर आझम यांचा जावेद भाऊ आहे. या अपहारातील 18 कोटी जावेदने घेतल्याचे सूत्रांकडून समजते.

कांदिवली येथे राहणारा जावेद आझम (48) हा इलेक्ट्रिक वस्तू वितरणाचा व्यवसाय करतो. या गुह्यात अटकेत असलेला सोलार पॅनल व्यावसायिक अरुणाचलम हा जावेदच्या संपर्कात होता. मेहताने अरुणाचलमचा मुलगा मनोहर याच्या मालाड येथील कार्यालयात आधी 15, मग 18 कोटी रुपये आणून दिले होते. त्यानंतर 18 कोटी रुपये अरुणाचलमने जावेदला दिले होते. हे तपासात समोर आल्यानंतर पोलीस जावेदचा शोध घेत होते, पण जावेद परागंदा झाला होता. अखेर रविवारी अरुणाचलम पोलिसांसमोर शरण आला.

122 कोटी रुपयांच्या अपहार प्रकरणात आतापर्यंत पोलिसांनी हितेश मेहता, बांधकाम व्यावसायिक धर्मेश पौन, माजी सीईओ अभिमन्यू भोन, मनोहर, कपिल देढीया, अरुणाचलम आणि जावेद यांना अटक केली आहे.