बनावट आदेशाने दोन कोटी उकळले

मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांचे बनावट आदेश दाखवून महिला व्यावसायिकाची दोन कोटी 30 लाख रुपयाची फसवणूक झाल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी आझाद मैदान पोलिसांनी गुन्हा नोंद करून तपास सुरु केला आहे.

नवी दिल्ली येथील रहिवासी असलेल्या महिलेने काही वर्षांपूर्वी अलिबाग येथे जखमी खरेदी केली होती. त्या जमिनीचे मूळ मालक असल्याचा दावा एकाने करत त्याने न्यायालयात धाव घेतली. सुनावणी दरम्यान सात बारा मध्ये त्या व्यक्तीच्या वडील धायाची नावे दिसत नसल्याने स्थानिक न्यायालयाने त्या व्यक्तीच्या बाजूने निकाल दिला होता. त्या निकाला विरोधात महिलेने सत्र न्यायालयात दाद मागितली. सत्र न्यायालयानंतर महिलेने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेण्याचे ठरवले. तिच्या परिचित असणाया वकिला ची माहिती दिली. महिलेने त्या वकिलाची भेट घेतली.

भेटी दरम्यान त्याने खटला चालवण्यासाठी 2 कोटी रुपये लागतील असे सांगितले. काही दिवसांनी दोन्ही खटल्यामध्ये आपल्या बाजूने निकाल लागल्याचे सांगून आदेशाच्या प्रति महिलेला पाठवल्या. त्यावर विश्वास ठेऊन महिलेने दोन कोटी दिले. आदेशाच्या मूळ प्रतिसाठी आणखी 30 लाखांची मागणी केली. वर्षानंतर महिलेने त्या आदेशाच्या प्रति एका अन्य वकिलाला पाठवल्या. त्या प्रति बनावट असल्याचे महिलेच्या निदर्शनास आणून दिले.