नवदाम्पत्यांना विठुरायाचे थेट दर्शन मिळणार

अनेक दिवसांच्या मागणीची दखल घेत मंदिर समितीने स्थानिकांसाठी श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनाची वेळ वाढवली असून आता रात्रीदेखील दर्शनास सोडण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत मंदिर समितीच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली. याबरोबरच नवदाम्पत्य, वयोवृद्ध, अंध, दिव्यांगांसाठी यांनाही झटपट दर्शन घेता येणार आहे.