
यजमान न्यूझीलंडने पाहुण्या पाकिस्तानचा सलग दुसऱ्या वन डे क्रिकेट सामन्यात 84 धावांनी धुव्वा उडविला. या विजयासह न्यूझीलंडने तीन सामन्यांची मालिका 2-0 अशीच खिशात टाकली. नाबाद 99 धावांची खेळी करणारा मिशेल हाय या सामन्याचा मानकरी ठरला.
न्यूझीलंडकडून मिळालेल्या 293 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना पाकिस्तानचा डाव 41.2 षटकांत 208 धावांवरच संपुष्टात आला. मधल्या फळीतील फहीम अशरफने सर्वाधिक 73 धावांची खेळी केली. तळाला नशिम शाह (51) व सुफियान मुकीम (13) यांनी फलंदाजी केली म्हणून पाकिस्तानला 200 धावांचा टप्पा ओलांडता आला. न्यूझीलंडकडून बेन सियर्सने सर्वाधिक 5, तर जेकब डफीने 3 फलंदाज बाद केले. त्याआधी, नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडने 8 बाद 292 धावसंख्या उभारली. त्यांच्याकडून मिशेल हाय (नाबाद 99) व महंमद अब्बास (41) यांनी उपयुक्त फलंदाजी केली. याचबरोबर निक केली (31) व हेन्री निकोलस (22) हे इतर दोन फलंदाज धावांची विशी ओलांडण्यात यशस्वी ठरले.