न्यूयॉर्कच्या नाईट क्लबमध्ये अंदाधुंद गोळीबारात 11 जण जखमी, 24 तासात तिसरी घटना

अमेरिकेमध्ये गेल्या चोवीस तासातील तिसरा मोठा हल्ला झाला आहे. आता न्यूयॉर्कच्या क्वीसमध्ये एका नाईट क्लबमध्ये हल्लेखोराने अंदाधुंद गोळीबार केल्याची घटना समोर आली आहे. यामध्ये 11 जण जखमी झाली आहेत. अजमूरा नाईट क्लबमध्ये हा गोळीबार रात्री 11 वाजून 45 मिनीटांनी झाला.

जमैका लाँग आयलँड रेल्वे रोड स्टेशनजवळील गोळीबाराच्या दृश्याला पोलीस विभागातील अनेक तुकड्यां घटनास्थळी पोहोचल्या आणि त्यांनी तपास सुरु केला.सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या घटनेच्या व्हिडिओमध्ये नाईट क्लबबाहेर मोठ्या प्रमाणात पोलीस आणि रुग्णवाहिका दिसत आहेत. मात्र, आतापर्यंत न्यूयॉर्क पोलीस विभागाने यासंदर्भात कोणतीही माहिती शेअर केलेली नाही. मात्र, संशयितांची ओळख पटली की नाही हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. स्थानिक मीडिया रिपोर्ट्सनुसार, पीडितांची प्रकृती अद्याप कळू शकलेली नाही.

न्यू ऑरलियन्समध्ये एका भरधाव ट्रकने लोकांना चिरडले, ज्यामध्ये 15 जखमी झाले. काही तासांनंतर, लास वेगासमधील ट्रम्प इंटरनॅशनल हॉटेलच्या बाहेर टेस्लाच्या सायबर ट्रकमध्ये स्फोट झाला. या घटनेनंतर 24 तासांत घडलेली ही तिसरी घटना आहे. त्यामुळे अमेरिका हादरली आहे.