थर्टी फर्स्टचे काऊंटडाऊन आतापासूनच सुरू झाले आहे. निसर्गरम्य रायगडात तर पर्यटकांची धूम असून अलिबाग, काशिद, मुरुड, श्रीवर्धनसह सर्व किनाऱ्यांवर गर्दीच्या लाटा उसळत आहेत. हॉटेल्स, कॉटेजेस, लॉजचे दर वाढूनही सर्व बुकिंग फुल्ल झाले आहे. तरुण- तरुणींसह बच्चेकंपनी, आजी-आजोबांचे जथ्थेच्या जथ्थे आपल्या आवडत्या डेस्टिनेशनवर पोहोचले आहेत. रोजचे टेन्शन बाजूला ठेवून पर्यटक समुद्रसफारीचा मनमुराद आनंद लुटत असून अनेकांनी काही गडबड नको म्हणून आपल्या सोबत ‘स्टॉक’चादेखील ‘बंदोबस्त’ करून ठेवला आहे. आता प्रतीक्षा आहे ती हॅप्पी न्यू इअर २०२५ ची..
हे आहेत हॉट स्पॉट रायगड :
अलिबाग, किहीम, वर्सेली, मांडवा, काशिद, मुरुड, दिवेआगर, श्रीवर्धन, नागाव, आक्षी, रेवदंडा, हरिहरेश्वर, माथेरान. पालघर केळवा, डहाणू, बोर्डी, शिरगाव, चिंचणी, दातिवरे, अर्नाळा, कळंब, राजोडी, झाई. ठाणे: येऊर, उपवन, गायमुख, मासुंदा तलाव, पामबीच.
समुद्रकिनाऱ्यांवर बोटिंग, घोडागाडी सफर, राईड्स, पाळणे याचा मनमुराद आनंद बच्चेकंपनी लुटत असून पॅराग्लायडिंग, स्पीड बोटी यालाही प्रचंड मागणी आहे.
पालीचा बल्लाळेश्वर, महडचा वरद विनायक, हरिहरेश्वर, साळाव बिर्ला मंदिर, टिटवाळा महागणपती येथे भाविकांची गर्दी होणार असल्याने व्यवस्थापकांनी आधीच नियोजन केले आहे.