नविन वर्षाचा आनंद होईल द्विगुणित, ‘या’ टॉप 5 हिल स्टेशन्सवर करा सेलिब्रेशन

काहीच दिवसात 2024 वर्ष सरून नवीन वर्ष 2025 सुरू होईल. नवीन वर्षाचे सेलिब्रेशन करण्यासाठी नागरिक सज्ज झाले आहेत. सेलिब्रेशनसाठी नागरिकांचे विशेषतः तरुणाईचे जोरदार प्लॅनिंग सुरू आहे. सेलिब्रेशनसाठी नक्की कुठे जावे हा प्रश्न तुम्हालाही पडला असेल तर आम्ही तुम्हाला हिंदुस्थानातील टॉप 5 हिल्सस्टेशनबाबत सांगणार आहोत.

निसर्गरम्य वातावरण, नयनरम्य दृश्य आणि आल्हाददायी वातावरणात तुम्हालाही जायला नक्कीच आवडेल. या ठिकाणी भेट देण्याचा प्लान करून तुम्ही कुटुंबासोबत नववर्षाचे सेलिब्रेशन करू शकता. तसेच येथे तुम्ही ट्रेकिंग, अॅडव्हेंचर्स आणि विविध सांस्कृतिक उपक्रमांचा आनंदही घेता येऊ शकता. जाणून घेऊया या हिल्सस्टेशन्सबाबत सविस्तर माहिती.

1. मनाली , हिमाचल प्रदेश

मनाली केवळ त्याच्या सुंदर पर्वतीय दृश्यांसाठी प्रसिद्ध नाही तर स्कीइंग, पॅराग्लायडिंग आणि ट्रेकिंगसारख्या साहसी खेळांचा देखील आनंद घेऊ शकता. येथील बर्फाच्छादित टेकड्या अद्भुत अनुभव देतात. यामध्ये विशेष आकर्षण म्हणजेच सोलांग व्हॅली, रोहतांग पास, हिडिंबा मंदिर आणि बियास नदीच्या काठावरील दृश्ये पाहण्यासारखी आहेत. तसेच येथे कुटुंबासोबत सेलिब्रेशन करता येऊ शकेल अशी अनेक हॉटेल्स आणि रिसॉर्ट्स आहेत.

2. दार्जिलिंग, पश्चिम बंगाल

दार्जिलिंगचे शांततापूर्ण वातावरण आणि तेथील अद्भुत दृश्यं तुमच्या सेलिब्रेशनला आणखी खास बनवतील. तेथे विशेषतः ट्टलमाता, टॉय ट्रेन, टायगर हिल आणि टी गार्डनला भेट देऊ शकता.

3.शिमला, हिमाचल प्रदेश

शिमल्यातील सुंदर पर्वतीय दृश्यं आणि ऐतिहासिक स्थळे पाहण्यासारखी आहेत. तसेच रिज ग्राउंड, मॉल रोड, कुफरी आणि समर हिल्स हे शिमल्याचे विशेष आकर्षण आहेत. त्याचबरोबर नवे वर्ष साजरे करण्यासाठी हॉटेल आणि रेस्टॉरंटमध्ये लाइव म्युजिक आणि डांस शो आयोजित केले जातात.

4. औली, उत्तराखंड

औली हे स्कीइंग आणि बर्फाळ पर्वतांसाठी ओळखले जाते. येथे सेलीब्रेशनसाठी आलेल्या पर्यटकांना एडव्हेंचर पॅकेज दिले जातात.

5.नैनीताल, उत्तराखंड

नैनिताल हे एका सुंदर तलावाभोवती वसलेले हिल स्टेशन आहे. तिथे विशेष नैना देवी मंदिर आणि स्नो व्ह्यू पॉइंटचा आनंद घेउ शकता.