अमेरिकेतील लुईझियाना येथील न्यू ऑर्लिन्स शहरात बोर्बेन रोडवर एका हल्लेखोराने नववर्षाचा जल्लोष सुरू असतानाच गर्दीत पीकअप ट्रक घुसवला. या हल्ल्यातील मृतांची संख्या वाढून आता 15 वर गेली आहे. तर अनेक जण जखमी आहेत. हल्लेखोराने ट्रकमधून उतरून अंदाधुंद गोळीबारही केला होता. त्यात दोन पोलीस अधिकारी जखमी झाले.
बुधवारी पहाटे 3:15 च्या सुमारास म्हणजेच भारतीय वेळेनुसार दुपारी 3 वाजून 15 मिनिटांनी ही दुर्घटना घडली. या दुर्गघटनेतील हल्लोखोर शमशुद्दीन बहार जब्बार याला देखील ठार मारण्यात आले आहे. ट्रकमध्ये इस्लामिक स्टेटचा झेंडा आढळला. हा दहशतवादी हल्ला असल्याचे पुरावे हाती लागले आहेत. तसेच घटनास्थळी इप्रोव्हायइड एक्सप्लोसिव्ह डिव्हाईस सापडल्याचे एफबीआय एजंट डंकन यांनी सांगितले.
दरम्यान या हल्ल्याप्रकरणी एफबीआयला काही व्हिडिओ सापडले आहे. जे हल्लेखोराने हल्ल्याच्या काही तास आधी सोशल मीडियावर पोस्ट केले होते, अशी माहिती अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन यांनी दिली. या पोस्टमध्ये त्याने इस्लामिक स्टेट या दहशतवादी संघटनेपासून प्रेरित असून लोकांना मारण्याची इच्छा व्यक्त केली होती. सध्या पोलिसांकडून याबाबत चौकशी केली जात आहे.
घटनास्थळी सापडली स्फोटके
घटनास्थळी इप्रोव्हायइड एक्सप्लोसिव्ह डिव्हाईस सापडल्याचे एफबीआय एजंट डंकन यांनी सांगितले. नागरिकांना तत्काळ घटनास्थळापासून सुरक्षित स्थळी हलवण्यात आले.