
अॅपलने नुकताच लाँच केलेला नवा आयफोन 16 E वर 10 हजार रुपयांची सूट मिळणार आहे. या फोनची प्री ऑर्डर सुरू झाली असून २८ फेब्रुवारीपासून विक्री सुरू होणार आहे. अॅपलचे अधिकृत डिस्ट्रीब्यूटर रेडिंग्टॉनकडून डिस्काउंट ऑफरची घोषणा केली आहे. या डिस्काउंट ऑफरमध्ये आयसीआयसीआय बँक, कोटक महिंद्रा बँक आणि एसबीआय बँक क्रेडिट कार्डधारकांना आयफोन खरेदीवर 4 हजारांचा तात्काळ कॅशबॅक दिला जाणार आहे. तसेच 6 हजार रुयपांचा एक्सचेंज बोनस दिला जात आहे. जर हे दोन्ही एकत्र केल्यास या फोनला 49,900 रुपयांत खरेदी करता येईल. या फोनची किंमत 59,900 रुपये आहे.