कॅलिफोर्नियातील नवीन जंगलांना भीषण आगीचा धोका

अमेरिकेला सध्या आगीचे चटके बसत आहेत. लॉस एंजेलिस येथील जंगलाला लागलेल्या भीषण  आगीला आज बरोबर एक आठवडा पूर्ण झाला. या आगीचा हाहाकार कायम असतानाच येथील नवीन जंगलांना आग लागण्याचा धोका आहे. उद्या, बुधवारपर्यंत लॉस एंजेलिसच्या परिसरात नैऋत्य कॅलिफोर्नियाच्या मोठय़ा भागात आग लागण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. अमेरिकेची सर्वाधिक हानी करणाऱ्या या आगीने आतापर्यंत किमान 24 जणांचे जीव घेतले. जखमींची संख्यादेखील मोठी आहे. सोमवारी रात्री उशिरा लॉस एंजेलिसमध्ये 45 ते 50 कि.मी. ताशी वेगाने वारे वाहत होते. आज मंगळवारी या वाऱ्याने आणखी वेग धारण केला. डोनाल्ड ट्रम्प 20 जानेवारीला दुसऱ्यांदा राष्ट्राध्यक्ष पदाची शपथ घेतल्यानंतर प्रभावित भागांना भेट देऊ शकतात.