New Delhi Stampede – पुन्हा एकदा रेल्वेचे अपयश आणि सरकारची असंवेदनशीलता दिसून आली, राहुल गांधींचा भाजपवर हल्लोबल

नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर झालेल्या चेंगराचेंगरची दुर्घटना घडली. यामध्ये 18 निष्पाप प्रवाशांना आपला जीव गमवावा लागला. यावरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सरकारवर निशाणा साधला आहे. या दुर्घटनेमुळे पुन्हा एकदा रेल्वेचे अपयश आणि सरकारची असंवेदनशीलता दिसून आल्याचे त्यांनी म्हंटले आहे.

लोकसभेचे विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस नेते, खासदार राहुल गांधी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’ वर पोस्ट शेअर करत भाजपवर निशाणा साधला. नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर चेंगराचेंगरीमुळे अनेक मृत्यू आणि जखमी झाल्याची बातमी अत्यंत दुःखद आणि वेदनादायक आहे. मी शोकाकुल कुटुंबाप्रती माझ्या मनापासून संवेदना व्यक्त करतो आणि या घटनेत जखमी झालेले प्रवासी लवकरात लवकर बरे होतील अशी प्राथना करतो, असे ते म्हणाले.

दिल्लीत झालेल्या घटनेमुळे पुन्हा एकदा रेल्वेचे अपयश आणि सरकारची असंवेदनशीलता दिसून आली आहे. प्रयागराजला जाणाऱ्या भाविकांची संख्या लक्षात घेता, रेल्वे स्थानकावर चांगली व्यवस्था करायला हवी होती. सरकार आणि प्रशासनाने केलेल्या गैरव्यवस्थापन आणि निष्काळजीपणामुळे कोणालाही आपला जीव गमवावा लागू नये याची काळजी सरकारने घ्यायला हवी, असे म्हणत सरकारवर टीका केली आहे.