![whatsapp](https://www.saamana.com/wp-content/uploads/2025/01/whatsapp-696x447.jpg)
व्हॉट्सअॅप हे इन्स्टंट मेसेजिंग अॅप जगभरात लोकप्रिय आहे. व्हॉट्सअॅपचे करोडो युजर्स आहेत. व्हॉट्सअॅप कंपनीही नवनवीन फीचर घेऊन येते. सध्या अशाच एका फीचरने लक्ष वेधून घेतलेय. हे फीचर भाषांतरासंदर्भात आहे. व्हॉट्सअॅपमधील भाषांतर (ट्रान्सलेशन) प्रक्रिया सुधारण्यावर काम सुरू आहे. नवे फिचर आपोआप भाषा ओळखेल आणि भाषांतर करेल. हे फीचर आल्यानंतर युजर्सना वेगवेगळ्या भाषांमध्ये चॅट करणे सोपे होईल.
कंपनीच्या दाव्यानुसार, संभाषणादरम्यान कोणताही डेटा कोणत्याही एक्सटर्नल सोर्सवर पाठवला जाणार नाही. ज्यामुळे युजर्सची गोपनीयता आणि सुरक्षितता सुनिश्चित केली जाईल. विशेष म्हणजे मेसेज ट्रान्सलेशनसाठी इंटरनेटची आवश्यकता भासणार नाही. नवीन फीचर ग्रुप चॅटमध्ये उपयुक्त ठरू शकेल. जिथे लोक विविध भाषांमध्ये चॅट करतात. हे फीचर प्रत्येक मेसेजची भाषा ओळखेल आणि ते अॅटोमॅटिक ट्रान्सलेट करेल. सध्या, कंपनी या फीचरवर काम करीत आहे. सुरुवातीला हे फीचर अँड्रॉइड युजर्ससाठी आणले जाईल.
स्टेट्समध्ये नवीन क्रिएशन टुल्स
■ व्हॉट्सअॅप लवकरच आपल्या युजर्ससाठी आणखी एक फीचर आणणार आहे. कंपनी स्टेट्स सेक्शनसाठी एक नवीन क्रिएशन टूल आणणार आहे. व्हॉट्सअॅप युजर्सना लवकरच त्यांच्या स्टेट्समध्ये अनेक नवीन टूल्स मिळणार आहेत.