चहासोबत तुम्हालाही हे पदार्थ खाण्याची सवय आहे का! आजपासून ही सवय बदला नाहीतर आरोग्यावर होतील दुष्परिणाम

चहा म्हणजे आपल्या हिंदुस्थानींचे आवडते पेय. चहा म्हटल्यावर आठवतो तो कट्टा किंवा नाका.. हिंदुस्थानात खास चहा पिण्यासाठी कट्टे आणि नाके आपल्याला पाहायला मिळतील. म्हणूनच चहा आणि चर्चा करणे हे आपल्या देशातील नागरिकांचे आद्यकर्तव्य मानले जाते. चहासोबत केवळ चर्चाच नाही तर खाणेसुद्धा तितकेच महत्त्वाचे मानले गेलेले आहे. परंतु तुम्ही चहासोबत काय खाताय यावर खूप गोष्टी अवलंबून आहेत. अन्यथा तुमच्या आरोग्यावर वाईट परीणाम होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. चहाच्या कपासोबत काय खावे याबाबत आपण जागरूक नसतो. त्यामुळे सध्या आपण चहाच्या जोडीला जे खाऊ नये ते आधी पाहुया.

हळद

हळदीच्या दुधामुळे रोग प्रतिकारशक्ती वाढविण्याच्या सल्ल्यामुळे हळद हा आपल्या आयुष्यातील अविभाज्य घटक बनला आहे. पण चहामध्ये मिसळल्यावर हळद तेवढीच हानिकारक ठरू शकते. चहासोबत हळद घेतल्यास बद्धकोष्ठता, आंबटपणा आणि गॅस सारख्या पोटाचे प्रश्न उद्भवतात.

सुकामेवा

चहासोबत सुकामेवा खाणे म्हणजे तब्येतीच्या तक्रारींना सुरुवात होण्यासारखे आहे. चहामध्ये दूध असल्यामुळे, दुधासोबत लोह असलेले पदार्थ खाणे हे हितावह नाही.

शेंगदाणे

चहा पिताना शेंगदाणे किंवा तत्सम पदार्थ खाणे टाळणेच हिताचे आहे. त्यामुळे पित्ताचा त्रास होण्याचा संभव अधिक असतो.

 

थंड पाणी

चहा प्यायल्यानंतर कधीही थंड पाणी पिऊ नये. कुठल्याही गरम पेयानंतर थंड पाणी पिणे हे हानीकारक असते. यामुळे पचनक्रिया कमकुवत होऊन, मळमळ होऊ शकते. म्हणूनच चहानंतर कधीही पाणी पिऊ नये असे जुने जाणते सांगतात.

 

 

 

डाळीचे पीठ

हे वाचल्यावर अनेकांच्या भुवया उंचावतील. परंतु हे सत्य आहे. चहा आणि भजी भारतीयांचे आवडते खाद्य आणि पेय. हरभरा पीठ चहाबरोबर सेवन केल्याने कधीकधी तीव्र पाचन समस्या निर्माण होतात.

(कोणतेही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा.)