
आफ्रिका खंडातील नामिबिया देशाला आज पहिली महिला राष्ट्राध्यक्ष मिळाली. नेतुम्बो नंदी-नदैतवाह असे त्यांचे नाव आहे. त्यांनी गेल्या वर्षी निवडणूक जिंकली होती. त्यांच्या शपथविधीला अंगोला आणि दक्षिण आफ्रिकेसह शेजारी राष्ट्रांचे प्रमुख सहभागी झाले.
72 वर्षीय नेतुम्बो नंदी-नदैतवाह यांनी नोव्हेंबरमध्ये झालेल्या निवडणुकीत 58 टक्के मते मिळाली होती. ‘एनएनएन’ या नावाने त्या ओळखल्या जातात. त्या साऊथ वेस्ट आफ्रिका पीपल्स ऑर्गनायझेशन या पक्षाच्या आहेत. त्यांनी 1990 मध्ये पहिल्यांदा खासदार म्हणून संसदेत प्रवेश केला होता. नामिबियात महिला आणि बाल कल्याण विभाग त्यांनी सांभाळला आहे. फेब्रुवारी 2024 मध्ये त्यांनी उपराष्ट्रपती म्हणून कार्यभार सांभाळला आहे. असे पद सांभाळणाऱ्या त्या नामिबियातील पहिल्या महिला आहेत.