विचित्र स्टंटसाठी प्रसिद्ध असलेला जगातील सर्वात मोठा YouTuber जिमी डोनाल्डसन उर्फ ’Mr Beast’ पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. जिमीने त्याच्या नव्या व्हिडिओमध्ये आपली आलिशान कार लॅम्बोर्गिनी थांबवण्यासाठी किती डक्ट टेप रोल्स लागतील हे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र अनेक नेटकऱ्यांना मिस्टर बीस्टचा हा व्हिडिओ अजिबात आवडला नाही आणि लोकांनी त्याला ट्रोल केले आहे.
केवळ 14 सेकंदाच्या या क्लिपमध्ये, लॅम्बोर्गिनी डक्ट टेपच्या भिंतीवर वारंवार आदळताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये मिस्टर बिस्ट कुणाला तरी त्याची लॅम्बोर्गिनी टेपच्या भिंतीवर आदळण्यास सांगत आहे. डक्ट टेपच्या एका रोलपासून सुरुवात करण्यात आली. मग हा आकडा 100, 1,000 आणि 5,000 पर्यंत पोहोचतो. एवढी जाड टेपची भिंत सुद्धा लॅम्बोर्गिनीला कोणतीही हानी पोहोचवू शकली नाही.
यानंतर आधी लॅम्बोर्गिनीचा हुड तुटतो. मग 15,000 वा रोल आदळल्यावर कार एका बाजूला सरकत रस्त्यावरून खाली उतरते. यानंतर, लॅम्बोर्गिनीला 20,000 व्या रोलमधून जाताना टेपची भिंत फाडण्यास त्रास झाला. मग 25,000 वा टेप रोल गाठल्यानंतर कार क्वचितच पुढे जाऊ शकली.
टेपचा अतिरिक्त रोल हा टर्निंग पॉइंट होता. 25,001 रोलवरील भिंतीवर आदळताच लॅम्बोर्गिनीचा पुढचा भाग उडून जातो. अनेक नेटकऱ्यांना मिस्टर बीस्टचा हा प्रयोग अजिबात आवडला नाही. यामुळे नेटकरी मिस्टर बिस्टला ट्रोल करत आहेत.