नीट पेपरफुटीप्रकरणी सीबीआयने राकेश रंजन ऊर्फ रॉकी नावाच्या व्यक्तीला अटक केली आहे. रॉकी हा या सर्व प्रकरणाचा सूत्रधार असल्याचे सांगितले जाते. रंजनला दहा दिवसांसाठी सीबीआय कोठडी देण्यात आली आहे. झारखंडच्या हजारीबाग येथील एका शाळेच्या मुख्याध्यापक आणि उपमुख्याध्यापकांसह डझनहून अधिक लोकांना विविध तपास यंत्रणांनी आतापर्यंत अटक केली आहे. याप्रकरणी सीबीआयने रॉकीसह नऊ जणांना अटक केली आहे. दरम्यान, नीटसंदर्भात वकिलांशी चर्चा करून 18 जुलैपर्यंत सुनावणी पुढे ढकलण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने घेतला. सर्वोच्च न्यायालयाने पेंद्र सरकार आणि एनटीएला बुधवारी सायंकाळपर्यंत नीट पेपरफुटीप्रकरणी शपथपत्र सादर करण्यास सांगितले होते. पेंद्र सरकार आणि एनटीए अर्थात नॅशनल टेस्टिंग एजन्सीने दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रांची प्रत काही पक्षकारांना मिळालेली नाही. त्यामुळे वकिलांशी चर्चा करून सुनावणी पुढे ढकलण्यात आली.