Show must go on! नितीन चंद्रकांत देसाई यांच्या निधनानंतर पहिल्यांदाच एनडी स्टुडिओत होणार शुटिंग

प्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांच्या निधनानंतर एनडी स्टुडिओ निपचित पडला होता. मात्र आता हा स्टुडिओ आता पुन्हा उभारी घेणार आहे. निमित्त आहे ते फुलवंती सिनेमाचं. प्राजक्ता माळी निर्मित आणि स्नेहल तरडे दिग्दर्शित ‘फुलवंती’ या सिनेमाचं शुटींग या स्टुडिओत सुरू होणार आहे. नितीन चंद्रकांत देसाई यांच्या निधनानंतर प्रथमच मराठी चित्रपटाचं काम तिथे होत आहे. आता बंद पडेलला स्टुडिओ पुन्हा उभारी घेतोय.

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या लिहिलेल्या कांदबरीवर आधारीत‘फुलवंती’हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. यानिमित्ताने प्राजक्ता माळी हिने निर्मिती क्षेत्रात पदार्पण केले आहे. सिनेमाचे लेखन-संवाद प्रसिद्ध लेखक, अभिनेते आणि दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनी केले आहेत. कुमार मंगत पाठक, अभिषेक पाठक, मंगेश पवार, श्वेता माळी आणि प्राजक्ता माळी निर्मित आहे.