
आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या पूर्वसंध्येला एनसीपीए (नॅशनल सेंटर ऑफ परफॉर्मिंग आर्टस्)द्वारे ‘चौराह’ या बहुभाषिक काव्यसंध्येचे आयोजन करण्यात आले होते. राज्य शासनाच्या विविध विभागांतील उच्चपदस्थ महिला अधिकारी या कार्यक्रमात सहभागी झाल्या होत्या. प्रशासकीय कामात स्वतःचा ठसा उमटवणाऱया या महिला अधिकाऱ्यांनी विविध भाषांतील कवितांचे, स्वरचित कवितांचे सादरीकरण करीत त्यांच्यात दडलेल्या कविमनाची ओळख या निमित्ताने करून दिली. यावेळी मुख्य सचिव सुजाता सौनिक, व्ही. राधा, अश्विनी भिडे, मनीषा वर्मा, इडजेस कुंदन यांच्या सह नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्टच्या संचालिका निधी चौधरी यांनी विविध भाषांतून कवितांचे सादरीकरण केले.