Photo – बीड जिल्ह्यातील मस्साजोगमध्ये शरद पवार यांनी घेतली संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांची भेट

बीड जिल्ह्याच्या मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांची राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी शनिवारी सांत्वनपर भेट घेतली. त्यावेळी त्यांनी उपस्थितांशी संवादही साधत ही घटना दुर्दैवी आणि गंभीर असल्याचे म्हटले आहे.

या हत्येने सर्वसामान्य लोकांना एक प्रकारचा धक्का बसलाय. बीड जिल्ह्याचा महाराष्ट्रात एक लौकिक आहे.

व्यक्तिगत हल्ला केला जातो आणि शेवटी तो हल्ला हत्येपर्यंत जातो हे चित्र अतिशय गंभीर अशा प्रकारचं आहे. याची नोंद राज्य आणि केंद्र सरकारला घ्यावीच लागेल.

मुख्यमंत्र्यांनी काही आश्वासने दिलीत. त्यांनी काही रक्कम दिली. ठीक आहे.. कुटुंबाला त्याची मदत होईल. पण तुम्ही कितीही मदत दिली तरी गेलेला माणूस येत नाही.

हे दुःख कमी होऊ शकत नाहि . आम्ही काही त्याच्या खोलात जाऊ इच्छित नाही. त्याच्यावर टिप्पणी करू इच्छित नाही.

जोपर्यंत त्याच्या खोलात जाऊन जे कोणी जबाबदार आहेत आणि जे कोणी सूत्रधार म्हणून याचा मागे आहेत त्यांना योग्य प्रकारचा धडा शिकवल्याशिवाय शांत बसायचं नाही.

केंद्र सरकार, राज्य सरकार, लोकप्रतिनिधी, वकील मंडळी आणि हितचिंतकांनी देशमुख कुटुंबीयांच्या मागे उभे राहण्याची गरज आहे.