वाल्मीक कराडला अटक केली असती तर समाधान मिळालं असतं असे विधान राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केले आहे. तसेच वाल्मीक कराडने आधी व्हिडीओ जारी केला आणि आत्मसमर्पण केलं, पोलिसांना कराड कुठे होता हे कसं कळालं नाही असेही सुळे म्हणाल्या.
माध्यमांशी बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, वाल्मीक कराडला अटक केली असती तर समाधान मिळालं असतं. सरकारने त्यांना अटक करायला हवी होती. कराडने केलेले आत्मसमर्पण नाही. कराडने एका माणसाचा खून केला आहे. देशमुख यांच्या कुटुंबीयांचे अश्रू कोणीही विसरणार नाही. कराडने एक व्हिडीओ जारी केला पण तो पोलिसांना सापडत नाही हे धक्कादायक आहे. माझा महाराष्ट्राच्या पोलिसांवर प्रचंड विश्वास आहे. बीड आणि परभणी प्रकरणात पीडित कुटुंबांना न्याय देण्याची जबाबदारी आपली आहे असे सुळे म्हणाल्या.
तसेच वाल्मीक कराडने आधी व्हिडीओ जारी केला आणि आत्मसमर्पण केलं. पोलिसांना या कराड कुठे होता हे आधी कसं कळलं नाही? मी पोलिसांच्या विरोध नाही. बीडच्या एसपींची बदली झाली तेव्हाही मी म्हटलं होतं की त्याला कोणी फोन केला? पोलिसांची बदली करून हे प्रश्न सुटत नाही. यामागे षडयंत्र रचणारे कोण होते? संतो, देशमुख यांच्या मारेकऱ्यांना वाचवणारे कोण होते याच्या मुळाशी आपण गेले पाहिजे. हा पक्षाचा नव्हे तर प्रवृत्तीचा विषय आहे.
देवेंद्र फडणवीस हे राज्याचे मुख्यमंत्री आहेत. मुख्यमंत्री म्हणून आमच्याही त्यांच्याकडून अपेक्षा आहेत. त्यांना एवढे मोठे जनमत मिळाले आहे त्यांनी देशमुक कुटुंबीयांना न्याय द्यावा. संतोष देशमुख यांच्या कन्येचे जेव्हा जेव्हा भाषण पाहते तेव्हा तेव्हा मी अस्वस्थ होते. त्या मुलीचे हसण्या खेळण्याचे दिवस आहेत आणि वडिलांना न्याय मिळावा म्हणून लढतेय असेही सुळे म्हणाल्या.