देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे राज्यात कायदा सुव्यवस्था ढासळली, विद्या चव्हाण यांची टीका

भाजप हिंदू मुस्लिम करून मतं मिळवत आहे असा अरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या विद्या चव्हाण यांनी केला आहे. तसेच देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे राज्यात कायदा सुव्यवस्था ढासळलीअशी टीकाही चव्हाण यांनी केली.

विद्या चव्हाण म्हणाल्या की, राज्यात कायदा सुव्यवस्था संपूर्णपणे ढासळली आहे. देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे गेल्या पाच ते सात वर्षात ही परिस्थिती निर्माण झाली आहे. तरीही फडणवीस योग्य कारभार सांभाळत नाहीत. फडणवीस हिंदु मुस्लिम करून मतं मिळवत आहेत. त्यामुळेच त्यांनी बटेंगे तो कटेंगे आणि एक है तो सेफ है सारख्या घोषणा दिल्या होत्या. ब्रिटिशांनी फोडा आणि राज्य करा ही निती अवलंबली होती तसेच भाजपही ही निती अवलंबित आहे असेही चव्हाण म्हणाल्या.