सत्तेचा माज बरा नव्हे मंत्रीसाहेब! पुण्यात बॅनर लावून नितेश राणेंना टोला, मुख्यमंत्र्यांनाही धरले धारेवर

कुडाळमध्ये भाजपने आयोजित केलेल्या एका कार्यकर्ता मेळाव्यात नितेश राणे यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं. महाविकास आघाडीचे सरपंच, पदाधिकारी ज्या गावात असतील त्या गावाला एक रुपयाचाही निधी द्यायचा नाही, असे ते म्हणाले होते. एवढेच नाही तर निधी पाहिजे असेल तर भाजपमध्ये या, अशी ऑफरही त्यांनी दिली. या उघड धमक्यांवरून नितेश राणे यांच्या विरोधात संताप व्यक्त केला जात आहे. दरम्यान, पुण्यात नितेश राणेंविरोधात बॅनर लावण्यात आले आहे.

मत्स्य व बंदरे खात्याचे मंत्री आणि भाजपचे आमदार नितेश राणे यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस ( शरदचंद्र पवार) पक्ष अॅक्शनमोडवर आलाय. राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार गटाकडून पुण्यातील कोथरूड परिसरात राणेंच्या विरोधात बॅनर लावण्यात आला आहे. “मुख्यमंत्री महोदय हाच का तुमचा नि:पक्षपातीपणा?” असा थेट सवाल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना करण्यात आला.


‘सत्तेचा माज बरा नव्हे मंत्रीसाहेब! मुख्यमंत्री महोदय हाच का तुमचा नि:पक्षपातीपणा? असे म्हणत आमदार नितेश राणे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला.

निधी पाहिजे तर भाजपात या, नितेश राणे पुन्हा बरळले; महाविकास आघाडीचे सरपंच असतील तिथे एक रुपयाही देणार नाही