लोकसभा निवडणुकीत बारामतीत पवार विरुद्ध पवार असा सामना रंगला होता. आता विधानसभेत पुन्हा पवार विरुद्ध पवार असा सामना रंगणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने 45 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. पक्षाने बारामती विधानसभा मतदारसंघातून युगेंद्र पवार यांना उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे बारामतीत पुन्हा पवार विरुद्ध पवार असा सामना रंगणार आहे.
कृपया प्रसिद्धीसाठी…
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी- शरदचंद्र पवार पक्षाच्या संसदीय मंडळाने दिलेल्या मान्यतेनुसार महाराष्ट्र विधानसभा निवडणूक – २०२४ साठी पक्षाच्या अधिकृत उमेदवारांची विधानसभानिहाय पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. pic.twitter.com/MGEckJzGI3
— Nationalist Congress Party – Sharadchandra Pawar (@NCPspeaks) October 24, 2024
Maharashtra State President of the NCP (Sharadchandra Pawar faction), Jayant Patil says, “Yogendra Pawar to contest from Baramati assembly constituency…”
Meanwhile, NCP fielded Deputy CM and party chief Ajit Pawar to contest from Baramati. #MaharashtraElection2024 pic.twitter.com/RZIRkAxwPL
— ANI (@ANI) October 24, 2024
अजित पवार गटाची 26 उमेदवारांची यादी नुकतीच जाहीर झाली होती. त्यात अजित पवार पुन्हा बारामतीत लढणार असल्याचे जाहीर झाले होते. आता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाने बारामतीतून युगेंद्र पवार यांना उमेदवारी जाहीर केली आहे.
जयंत पाटील – इस्लामपूर
जितेंद्र आव्हाड – कळवा-मुंब्रा
अनिल देशमुख- काटोल
रोहित पवार – कर्जत -जामखेड
रोहिणी खडसे – मुक्ताईनगर
Pune | Maharashtra State President of the NCP (Sharadchandra Pawar faction), Jayant Patil says, “As per instructions from Nation President Sharad Pawar, I am announcing the first list of NCP SP. Jayant Patil to contest from Islampur. Jitendra Awahad to contest from Mumbra. Anil… pic.twitter.com/q01WlOonQl
— ANI (@ANI) October 24, 2024