![Rajesaheb Deshmukh on](https://www.saamana.com/wp-content/uploads/2025/02/Rajesaheb-Deshmukh-on--696x447.jpg)
सर्व आरोपी धनंजय मुंडेंचे खास कार्यकर्ते म्हणून काम करता, असं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्षाचे नेते राजेसाहेब देशमुख म्हणाले आहेत. एखादा तुरुंगातून बाहेत आल्यानंतर तो धनंजय मुंडे आणि वाल्मीक कराडचा खास माणूस होतो, असंही ते म्हणाले आहेत. तसेच मराठवाड्यातील गॅंगवॉरला मुंडे आणि वाल्मीक जबाबदार असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. माध्यमांशी संवाद साधताना ते असं म्हणाले आहेत.
काय म्हणाले राजेसाहेब देशमुख?
राजेसाहेब देशमुख म्हणाले की, ”हे सगळे आरोपी धनंजय मुंडे यांचे खास कार्यकर्ते म्हणून काम करतात. धनंजय मुंडे आणि वाल्मीक कराड यांची जी टोळी आहे, ती संपूर्ण मराठवाड्यात पसरली आहे. कोणावरही 302 चा गुन्हा दाखल झाला की, तो मुंडे आणि कराड यांचा खास माणूस होतो. एखाद्या माणसाने गावात गुन्हा केला आणि तो तुरुंगातून बाहेर आला की, लगेच मुंडे आणि कराड यांचा खास माणूस होतो. हे गुन्हेगारांना पोसणारी लोक आहेत.”