चंद्रचूड यांच्या कार्यकाळात सत्तासंघर्षाचा निकाल लांबणीवर पडणे हे अतर्क्य, ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ सिंघवी यांचे मत

हिंदुस्थानचे माजी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड हे संयमी होते, कामाचा ताण ते उत्तमरित्या सांभाळत होते. पण त्याच्यांच काळात संत्तासंघर्षाचा निकाल लांबणीवर पडला हे विसंगत आहे असे प्रतिपादन कायदेतज्ज्ञ आणि काँग्रेस नेते अभिषेक मनू सिंघवी यांनी केले आहे. तसेच लवकर निकाल लागावा म्हणून चंद्रचूड यांच्याकडे अनेकदा विनंतीही केली पण त्यांच्या काळात निकाल लागलाच नाही असेही सिघवी म्हणाले.

लोकसत्ता या दैनिकाला अभिषेक मनू सिंघवी यांनी मुलाखात दिली. त्यावेळी सिंघवी म्हणाले की, माजी सरन्यायाधीश चंद्रचूड हे विद्वान होते, संयमी होते. इतकंच नाही तर ते उत्तमरित्या कामाचा ताण सांभाळत होते. पण त्यांच्याच कार्यकाळात सत्तासंघर्षाचा निकाल लागला नाही असेह सिंघवी म्हणाले.

महाराष्ट्रात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटला. त्याची बाजू आपण सर्वोच्च न्यायालयात मांडली. धनंजय चंद्रचूड यांची सरन्यायाधीश म्हणून कारकीर्द 90 टक्के चांगली होती. पण त्यांच्या कार्यकाळात सत्तासंघर्षाचा निकाल न देण्याची कार्यपद्धती अतर्क्य होती असे सिंघवी म्हणाले. महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर लवकरात लवकर निकाल लागावा अशी विनंती त्यांनी आम्ही वारंवार केली. तरी अखेरपर्यंत निकाल लागलाच नाही. 26 नोव्हेंबरला महाराष्ट्र विधानसभेची मुदत संपणार आहे. असे असले तरी या याचिका निष्फळ ठरणार नाही.

राज्यघटनेतले दहावे परिशिष्टाचा अर्थ, फुटलेल्या आमदारांचे कृत्य, विधानसभा आणि राज्यपालांनी निभावलेली भुमिका तसेच केंद्रीय निवडणूक आयोगाने घेतलेले निर्णय या मुद्द्यांवर सर्वोच्च न्यायालय काय निर्णय देईल हे महत्त्वाचे ठरेल. कारण याच निर्णयांवरून भविष्यकाळातील राजकीय घटनांसाठी मार्गदर्शक ठरतील असेही सिंघवी म्हणाले.