अजित पवार गटाच्या आमदार पुत्राला मराठ्यांनी घेरलं; समाजासाठी काय केलं? असा जाब विचारत गावातून हाकलून लावलं

माढा विधानसभा मतदासंघाचे आमदार बबनदादा शिंदे यांचे सुपुत्र रणजित शिंदे हे आज पंढरपूर तालुक्यातील तुंगत येथे शासकीय योजनेतील विकासकामांच्या शुभारंभ सोहळ्यासाठी आले होते. कार्यक्रम झाल्यानंतर गावातील मराठा तरुणांनी त्यांना घेराव घालून चांगलीच फजिती केली.

तुमचे वडील 15 वर्षे झाले आमदार आहेत. त्यांनी समाजासाठी काय केले? विधानसभा सभागृहात मराठा आरक्षणाबाबत कधीही आवाज उठविला नाही. शिंदे कुटुंबाने कुणबी प्रमाणपत्र मिळविले. मग समाजातील इतर लोकांना मिळवून देण्यासाठी तुम्ही काय केले? तुमच्या फायद्यासाठी तुम्ही काहीही राजकीय निर्णय घेता. पण मतदारसंघातील लोकांना तुम्ही कधी विश्वासात घेत नाही, असा हल्लाबोल गावकऱ्यांनी केला.

मनोज जरांगे पाटील यांना 50 हजाराची मदत केली म्हणून जाहीर वाच्यता करता. म्हणून समाजाने 1 रुपया वर्गणी काढून तुमचे पैसे परत केले. अन्य समाजाला आरक्षण द्या म्हणून आमदारांनी लेखी पत्र दिले. मात्र मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून कधी पत्र लिहिले नाही की सभागृहात आवाज उठवला नाही.

“बारामतीत पवार कुटुंब एकाच मंचावर; समोरासमोर आले, पण…”, नक्की काय घडलं?

यापुढे गावात यायचे असेल तर समाजाला विचारुन या अन्यथा अपमानीत व्हावे लागेल असा सज्जड दम मराठा युवकांनी भरला. ‘एक मराठा लाख मराठा’ घोषणा देत युवकांनी रणजित शिंदे व त्यांच्या सोबत आलेल्या कार्यकर्त्यांना गावातून अक्षरशः हुसकावून लावले.</p