माझ्या मुलीला आणि जावयाला नदीत फेकून द्या, अजित पवार गटाच्या मंत्र्याचे अजब आवाहन

माझ्या मुलीने आणि जावयाने विश्वासघात केला आहे, त्यामुळे त्या दोघांना नदीत फेकून द्या असे आवाहन अजित पवार गटाचे मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी केले आहे. तसेच जे लोक पक्ष सोडून जातात त्यांच्याकडे लक्ष देण्याची गरज नाही असेही आत्राम म्हणाले.

गडचिरोलीत आज अजित पवार गटाची जनसन्मान यात्रा होती. यावेळी आत्राम यांनी भाषण केले. तेव्हा आत्राम म्हणाले की, जे लोक पक्ष सोडून जातात त्यांच्याकडे लक्ष देऊ नका,आमच्याच कुटुंबातील लोक आमच्या राजकीय प्रतिष्ठेचा वापर करून दुसऱ्या पक्षास सामील होऊ पाहत आहेत.पण माझ्या मुलीवर आणि जावयावर विश्वास ठेवू नका. या सर्वांना नदीत फेकून दिले पाहिजे. जी मुलगी आपल्या बापाची नाही झाली ती जनतेची काय होणार, तुम्हाला याचा विचार करावा लागेल. माझी एक मुलगी जर मला सोडून गेली असेल तर दुसरी मुलगी माझ्यासोबत खंबीरपणे उभी आहे माझे संपूर्ण कुटुंब एकत्र आहे असेही आत्राम म्हणाले.