
झारखंडमधील पश्चिम सिंहभूम जिल्ह्यातील सारंडा वनक्षेत्रात नक्षलवाद्यांनी हल्ला केला. यावेळी IED चा स्फोट झाला. यात केंद्रीय राखीव पोलिस दलाचे (CRPF)चे तीन जवान जखमी झाले.
स्फोटानंतर जखमी जवानांना वैद्यकीय उपचारांसाठी रांचीला विमानाने हलविण्यात आले.
सीआरपीएफ 197 बटालियनच्या जवान शोध मोहीम राबवत असताना, सारंडा जंगलात दूर्गम भागात असलेल्या बालिवामध्ये ही घटना घडली.