नवाब मलिक हे अजित पवार गटात असल्याचे समोर आले आहे. मलिक यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून उमेदवारी अर्जही भरला आहे. असे असले तरी भाजपने त्यांच्या उमेदवारीला विरोध केला आहे. तसेच भाजपचा मला विरोध का आहे हे संपूर्ण देशाला माहित आहे असे विधान मलिक यांनी केले आहे.
हिंदुस्तान टाईम्स या वृत्तपत्राला नवाब मलिक यांनी मुलाखत दिली आहे. तेव्हा नवाब मलिक म्हणाले की, मी पक्षात फुट पडली तेव्हा मी अजित पवार गटात सामील झालो, कारण जेव्हा कठीण काळ होता तेव्हा अजित पवार माझ्या पाठीमागे खंबीरपणे उभे होते. माझ्या उमेदवारीला विरोध असतानाही अजित पवारांनी मला अधिकृतरित्या उमेदवारी दिली. त्यामुळे अजित पवार यांच्यासोबत राहणे हे माझं कर्तव्य होतं असे मलिक म्हणाले.
भाजप तुमचा एवढा विरोध का करते यावर मलिक म्हणाले की संपूर्ण देशाला माहित आहे की भाजपला माझा विरोध का आहे. यावर आणखी काही बोलण्याची गरज नाही असेही मलिक म्हणाले.