नवी मुंबईत सिडकोची छोटी दुकाने सुसाट; उलव्यात अवघ्या 18 चौ. मी. गाळ्याला सवा कोटीचा भाव

सिडकोने उलवे येथील बामणडोंगरी रेल्वे स्थानकानजीक बांधलेल्या व्यावसायिक दुकानांवर ग्राहकांच्या अक्षरशः उड्या पडल्या. त्यामुळे ही लहान दुकाने सिडकोने कोट केलेल्या दरापेक्षा तिप्पट दराने विकली गेली. मोक्याच्या ठिकाणी असलेल्या दुकानांच्या लिलावाने कोटीची उड्डाणे घेतली. १८ चौरस मीटर क्षेत्रफळ असलेले दुकान थेट १ कोटी २० लाख रुपयांना विकले गेले.

सिडकोने बामणडोंगरी रेल्वे स्थानकासमोर सुमारे पाच हजार घरांचा मोठा गृहनिर्माण प्रकल्प उभा केला आहे. या प्रकल्पाच्या खाली सुमारे २४३ छोटे व्यावसायिक गाळे काढण्यात आले आहेत. हे गाळे विकण्यासाठी सिडकोने निविदा मागवल्या होत्या. त्यानुसार गेल्या महिन्यात ई-ऑक्शन घेण्यात आली होती. मात्र तांत्रिक अडचण आल्यामुळे सर्व्हर डाऊन झाले आणि ई-ऑक्शन बंद पडली. त्यामुळे या गाळ्यांसाठी पुन्हा ई-ऑक्शन घेण्यात आली. त्यामुळे या गाळ्यांना सुमारे तीन पट वाढीव दर मिळाला. या गाळ्यांची विक्री करण्यासाठी सिडकोने दोन लाख रुपये प्रतिचौरस मीटर असा दर कोट केला होता. मात्र गाळ्यांची विक्री प्रत्यक्षात दुप्पट ते तिप्पट वाढीव दराने झाली. मोक्याच्या ठिकाणी असलेला ४० क्रमांकाचा गाळा थेट १ कोटी २० लाख रुपयांना विकला गेला. या गाळ्याचे क्षेत्रफळ फक्त १८ चौरस मीटर आहे. ९७ क्रमांकाचा

छोट्या दुकानांना मोठी मोगणी
नवी मुंबईच्या प्रत्येक नोडमध्ये छोट्या दुकानांना मोठी मागणी आहे. मात्र दुर्दैवाने या दुकानांची बिल्डरकडून निर्मिती केली जात नाही. बहुतेक व्यावसायिक लहान दुकानांच्या शोधात असतात. उलवे नोडमध्ये सिडकोची दुकाने ही आकाराने छोटी होती, त्यामुळे त्यांना चांगला प्रतिसाद मिळाला. परवडणाऱ्या घरांप्रमाणे परवडणारी दुकानांचीही निर्मिती होणे आवश्यक आहे, अशी प्रतिक्रिया बांधकाम व्यावसायिक प्रकाश बाविस्कर यांनी व्यक्त केली आहे.

गाळा थोडा आऊटसाईडला आहे. या गाळ्याची विक्री थेट 84 लाख रुपयांना झाली. या सर्व गाळ्यांच्या विक्रीमधून सिडकोच्या तिजोरीमध्ये कोट्यवधी रुपयांचा महसूल जमा झाला आहे.

व्यवसायाला चालना मिळणार
सर्वसामान्यांसाठी घरांची निर्मिती करण्याबरोबर सिडकोने छोट्या व्यावसायिकांसाठी ही एक संधी उपलब्ध केली होती. सिडकोच्या या उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. या गाळ्यांच्या विक्रीमुळे उलवे परिसरात व्यवसायाला चालना मिळणार आहे. छोट्या व्यावसायिकांना उलवे नोडमध्ये आपला व्यवसाय वाढवण्याची संधी मिळाली आहे. या गाळ्यांच्या विक्रीला मिळालेला प्रतिसाद म्हणजे सिडकोच्या विश्वासार्हतेवर शिक्कामोर्तब आहे, अशी प्रतिक्रिया सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी व्यक्त केली आहे.