
महाराष्ट्राच्या संगीत नाटक परंपरेमध्ये दिवंगत गायक नट अरविंद पिळगांवकर यांचे नाव सन्मानाने घेतले जाते. मानापमान, एकच प्याला, अमृत मोहिनी, संत कान्होपात्रा अशा कितीतरी नाटकांत त्यांचा सहभाग होता. त्यांचे हे योगदान लक्षात घेऊन नेहरू सेंटरने 25 एप्रिल रोजी सायंकाळी 6.45 वाजता वरळीच्या नेहरू सेंटर येथे ‘नाट्य गीतांजली’ या कार्यक्रमाचे आयोजन विनामूल्य केले आहे. सहसंचालक चंद्रकांत राणे यांच्या संकल्पनेतून सादर होणारा हा कार्यक्रम रंगमंचावर सादर करण्यासाठी ज्ञानेश पेंढारकर यांनी पुढाकार घेतला आहे. पं. सुरेश बापट, नीलाक्षी पेंढारकर, भाग्येश मराठे, धवल भागवत यांचा सहभाग असणार आहे.