राष्ट्रवादीच्या गटनेतेपदी जितेंद्र आव्हाड, आर. आर. आबांचे पुत्र रोहित पाटील मुख्य प्रतोद

राष्ट्रवादी काँग्रेसच्या नवनिर्वाचित आमदारांची बैठक आज झाली. या बैठकीत गटनेतेपदी जितेंद्र आव्हाड यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी दिवंगत नेते आर. आर. पाटील यांचे पुत्र रोहित पाटील यांच्याकडे मुख्य प्रतोद पदाची जबाबदारी सोपवली आहे. आमदार उत्तम जानकर यांच्याकडेही प्रतोद पदाचा कारभार सोपवण्यात आला आहे. रोहित पाटील यांनी तासगाव मतदारसंघातून तर उत्तम जानकर यांनी माळशिरस मतदारसंघातून विधानसभा निवडणूक जिंकली.