राष्ट्रवादी कॉँग्रेसने सर्व प्रवक्त्यांना पदावरून हटवले

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व प्रवक्त्यांना पदावरून हटविण्यात आले आहे. प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांच्या सूचनेनुसार प्रवक्तेपदावरील नियुक्त्या तत्काळ प्रभावाने रद्द करण्यात येत असल्याचे सरचिटणीस रवींद्र पवार यांनी म्हटले आहे.

राष्ट्रवादी कॉँग्रेस (शरदचंद्र पवार)  पक्षाचे एकूण 22 प्रवक्ते आहेत. ते विविध माध्यमांवर पक्षाची भूमिका मांडत असतात. मात्र, जयंत पाटील यांच्या आदेशाने एका पत्राद्वारे सर्व प्रवक्त्यांच्या नियुक्त्या तडकाफडकी रद्द करण्यात आल्याने राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू आहे.