![reserve-bank-of-india](https://www.saamana.com/wp-content/uploads/2020/08/Reserve-Bank-of-India-696x447.jpg)
आता चलनामध्ये लवकरच 50 रुपयांची नवी नोट येणार आहे. याबाबत केंद्रीय रिझर्व्ह बँकेने माहिती दिली आहे. आरबीआयने म्हटले आहे की, लवकरच 50 रुपयांच्या नवीन नोटा जारी केल्या जातील. त्या नव्या नोटेवर RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांची स्वाक्षरी असेल. मल्होत्रा डिसेंबरमध्येच आरबीआय गव्हर्नर बनले आणि त्यांनी शक्तीकांत दास यांची जागेवर नियुक्ती झाली आहे. नवीन नोटेची रचना सध्या चलनात असलेल्या महात्मा गांधी यांच्या नोटेच्या मालिकेसारखीच असेल.
लवकरच चलनात येणाऱ्या 50 रूपयांच्या नव्या नोटांवर भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांची स्वाक्षरी असेल. ही नोट भारतीय रिझर्व्ह बँकेकडून जारी करण्यात येणार आहे. गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात संजय मल्होत्रा यांची शक्तीकांत दास यांच्या जागी नवे गव्हर्नर म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. आरबीआयमध्ये येण्यापूर्वी मल्होत्रा हे महसूल सचिव होते. भारतीय रिझर्व्ह बँकेने यासंदर्भात आपल्या संकेतस्थळावर माहिती दिली आहे.
या माहितीत म्हटले आहे की, देशाच्या मध्यवर्ती बँकेकडून लवकरच पन्नास रूपयांच्या नव्या नोटा जारी केल्या जाणार आहेत. या नोटांवर भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांची स्वाक्षरी राहणार आहे तर महात्मा गांधी यांचे छायाचित्र कायम राहणार आहे. ही नवी नोट आधीच्या पन्नास रूपयांच्या नोटेसारखीच राहणार आहे, असंही रिझर्व्ह बँकेने म्हटले आहे. रिझर्व्ह बँकेकडून यापूर्वी जारी करण्यात आलेल्या 50 रूपयांच्या सर्व नोटाही व्यवहारात राहणार आहे.