UPPSC परीक्षार्थिंचा योगी सरकारविरोधात रोष; प्रयागराजमध्ये निदर्शने, पोलिसांशी झटापट

UPPSC परीक्षेला बसणाऱ्या तरुणांनी योगी सरकारविरोधात रोष प्रकट केला आहे. राज्य लोकसेवा आयोगाच्या पीसीएस प्री 2024 आरओ/ ओआऱओ प्रारंभिक परीक्षा 2023 नॉर्मलाइजेशनच्या विरोधात विद्यार्थ्यांनी जबरदस्त निदर्शने केली. अनेक परीक्षार्थी राज्य लोकसेवा आयोगाच्या कार्यालयासमोर जमले आणि हातात पोस्टर झळकावत घोषणाबाजी केली. संतप्त परीक्षार्थिंनी पोलिसांनी उभारलेले बॅरिकेट्स तोडले त्यानंतर पोलिसांशी त्यांची वादावादी झाली आणि झटापटही झाली.

परीक्षार्थी विद्यार्थी प्रक्रियेतील नॉर्मलाइजेशनचा विरोध करत आहेत. एकाच दिवसात एकाचवेळी पीसीएस प्री 2024 आणि आऱओए आणि एआऱओ प्री 2023 घेण्यात याव्या, अशी त्यांची मागणी आहे. या तरुणांनी दोन दिवसांपूर्वी शांतीपूर्ण निदर्शने करण्याची घोषणा केली होती. जोपर्यंत याबाबत ठोस आश्वासन मिळत नाही, तोपर्यंत विरोध प्रदर्शन सुरूच राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. विद्यार्थ्यांच्या निदर्शनांमुळे या मार्गावरील वाहतुकीलाही फटका बसला आहे.

तरुणांच्या निदर्शनांमुळे राज्य लोकसेवा आयोग कार्यालयाच्या परिसरात मोठ्या प्रमाणात पोलीस तैनात करण्यात आले आहे. परिसरात पोलिसांना बॅरिकेट्स उभारले आहेत. तसेच विद्यार्थ्यांमध्येही संताप व्यक्त होत आहे. विद्यार्थी आक्रमक होत असल्याने संधर्ष वाढण्याची शक्यता आहे. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता घटनास्थळी एडीसीपी अभिषेक भारती उपस्थित आहेत.

पीएससी प्री 2024 परीक्षा 7 आणि 8 डिसेंबर रोजी प्रस्तावित आहे. तर आर ओ/एआरओ प्रारंभिक 2023 परीक्षा 22 आणि 23 डिसेंबरला होणार आहेत. विद्यार्थ्यांच्या निदर्शामुळे या परीक्षांवरही परिणाम होण्याची शक्यता आहे. विद्यार्थी आक्रमक झाल्याने पोलीस आणि प्रशासन सज्ज आहेत.