
संसदेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणाला उत्तर देताना तृणमूल काँग्रेसचे खासदार कल्याण बॅनर्जी यांनी खास शैलीत मोदी सरकारवर हल्लाबोल केला. तसेच श्रीरामपूर येथील जनतेने आपल्याला 1 लाख 75 हजाराच्या मताधिक्याने निवडून दिले. हे मताधिक्य नरेंद्र मोदी यांना मिळालेल्या मताधिक्यापेक्षा कितीतरी पटींनी जास्त आहे, असे सांगत त्यांनी मोदींनाही टोला लगावला. निवडणूक प्रक्रियेच्या निःपक्षपातीपणाबाबतही त्यांनी परखड मत व्यक्त केले. कल्याण बॅनर्जी यांनी लोकसभेत केलेल्या फटकेबाजीची राजकीय वर्तुळात चर्चा होत आहे.
आम्ही सर्वजण पंतप्रधान मोदी यांचा सन्मान करतो. मात्र, मोदी विरोधकांचा सन्मान करत नाहीत, असे सांगताना मला खेद होत आहे, प हे सत्य आहे. मोदी पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांचा, तामिळनाडूमध्ये स्टॅलीन यांचा, उत्तर प्रदेशात अखिलेश यादव यांचा, कर्नाटकात सिद्धरामय्या यांचा, दिल्लीत अरविंद केजरीवाल यांचा द्वेष करतात. यातून त्यांची विरोधकांबाबतची भावना दिसून येते, असा हल्लाबोलही त्यांनी केला.
भाजपने अब की बार 400 पार घोषणमा देत खेळ सुरू केला….मात्र यावेळी मिमिक्री करत त्यांचे काय झाले तर 240 यावेळी त्यांनी केलेल्या मिमिक्रीचीही चर्चा होत आहे. जनतेने त्यांना योग्य जागा दाखवली. आधी मोदी आत्मविश्वासाने संसदेत प्रवेश करत होते. आता ते नीतीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू यांची कुबडी घेऊन येतात, असा जबरदस्त टोलाही बॅनर्जी यांनी लगावला.
जनतेने एनडीएला 48 टक्के मत दिले आहे. तर इंडिया आघाडीला 51 टक्के मत दिले आहे. त्यामुळे जनतेला माहिती आहे की, मोदींच्या गॅरंटीमध्ये वॉरंटी नाही. त्यामुळे विरोधक भक्कम आणि स्थिर आहे. तर सरकार कुबड्यांवर असल्याने अस्थिर आहे, याचे एनडीएने भान ठेवावे, असेही कल्याण बॅनर्जी यांनी भाजप आणि एनडीएला सुनावले.
आता भाजपची मनमानी जास्त काळ चालणार नाही. महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशात विधानसभा निवडणुका जाल्यावर चि स्पष्ट होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
मोदी भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून विरोधकांवर टीका करतात. कदाचित आज पुन्हा तेच आरोप नव्याने करतील. मात्र, टीडीपी आणि अजित पवार गटाच्या नेत्यांनी त्यांनी सोबत घेतले आहे. आता भ्रष्ट नेत्यांना पक्षात घेत त्यांना सरकार स्थापन करावे लागत आहे. त्यामुळे आता भ्रष्टाचारावर कोण कारवाई करणार, तसेच एक्झिट पोलनंतर शेअर बाजाराचा मुद्दा उपस्थित करणाऱ्यांवर कोणा कारवाई करणार, असा सवाल उपस्थित करत बॅनर्जी यांनी भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर मोदी सरकारला टोला हाणला.